चालू खाते

चालू खाते (Current Account)

जर तुम्ही व्यावसायिक असाल आणि तुमचे दैनंदिन आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत असतील तर SSD मल्टीस्टेटचे चालू खाते तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरेल. व्यावसायिकांचे आर्थिक व्यवहार सुरळीत पार पाडण्यासाठी SSD मल्टीस्टेट ग्राहकाला चालू खात्याद्वारे अत्याधुनिक बँकिंग सुविधा आणि व्यवसायात आर्थिक स्थैर्य आणण्यास मदत करते. चालू खात्यासंदर्भात अधिक माहितीसाठी आजच नजीकच्या SSD मल्टीस्टेटला अवश्य भेट द्या.

फॉर्म डाउनलोड करा

व्याज दर

अनुक्रमांक प्रकार किमान शिल्लक सामान्य ज्येष्ठ नागरिक
1 चालू खाते ५०० ०.००% ०.००%

डिजिटल प्रीमियम चालू खाते

2 प्रीमियम चालू खाते ५००० ५.००% ५.००%

फायदे

सुविधा: : चालू खात्यात तुम्ही सहजपणे पैसे आदान-प्रदान करू शकता चेक-राइटिंग आणि डेबिट कार्ड यांसारख्या वैशिष्ट्यांसह तुम्ही सहजपणे बिले भरू शकता, खरेदी करू शकता आणि रोख पैसे काढू शकता.

ओव्हरड्राफ्ट सुविधा: या ओव्हरड्राफ्ट सुविधेअंतर्गत तुम्ही एका विशिष्ट मर्यादेपलीकडील रक्कम काढू शकता. तुमच्या अडी-अडचणीच्या काळात ही सुविधा तुम्हाला उपयुक्त ठरू शकते.

ऑनलाइन बँकिंग: SSD मल्टीस्टेट तुम्हाला तुमचा आर्थिक व्यवहार सुरळीत पार पाडण्यासाठी ऑनलाइन बँकिंग सुविधा पुरविते. यामध्ये तुम्ही तुमचा आर्थिक व्यवहार घरबसल्या करु शकता.

व्यापारी सेवा: व्यापऱ्यांची आर्थिक उलाढाल सुरळीतरीत्या पार पाडण्यासाठी आम्ही व्यापऱ्यांना क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड सुविधा पुरवून ग्राहकांकडून पेमेंट स्वीकारण्याची परवानगी देतो.

महत्त्वाचे तपशील

निकष

✔ किमान शिल्लक रु. ५०००

✔ अमर्यादित अर्थव्यवहार.

✔ प्रती दिवस २ लाखपर्यंत पैसे काढण्याची सुविधा.

✔ व्यवहार शुल्क शून्य रुपये

✔ इन्व्हेंटरी कर्ज उपलब्ध

आवश्यक कागदपत्रे

✔ पॅन कार्ड

✔ पत्त्याचा पुरावा

✔ आधार कार्ड

✔ 3 छायाचित्रे